शिरूर तालुका

मलठण केंद्र शाळेत रंगला ‘आठवडा बाजार’; चिमुकल्यांनी अनुभवले खरेदी-विक्रीचे व्यवहार

शिरूर (सुनील जिते): मलठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, मलठण व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘आठवडा बाजार’ व ‘आनंद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने भरवण्यात आलेल्या या बाजाराला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात विविध स्टॉल्स लावले होते. यात प्रामुख्याने ताजी मेथी, कोथिंबीर, शेपू यांसारख्या पालेभाज्या, फळे, तसेच घरगुती तयार केलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. मुलांनी स्वतः वजनकाटा हाताळणे, पैशांचा हिशोब करणे आणि ग्राहकांशी संवाद साधणे अशा गोष्टींमधून व्यवहार ज्ञानाचे धडे गिरवले.शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ वाव्हळ यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी व्यावसायिक कौशल्य आणि आत्मविश्वास निर्माण होतो. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

18 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago