शिरूर तालुका

अरेरावी करणाऱ्या शिरुरच्या ‘त्या’ मुजोर वाहतूक नियंत्रकाची पाठराखण कशासाठी…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर बसस्थानक येथे स्मार्टकार्ड काढण्यासाठी दिव्यांग मुलीला घेऊन आलेल्या महिलेशी, पत्रकार व नागरिकांशी शिरुर डेपोतील वाहतूक नियंत्रकाने उद्धटपणे बोलत त्यांना दमदाटी केल्याचा प्रकार शिरुर बसस्थानकात नुकताच घडला होता. हा सर्व प्रकार वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेला असतानाही वाहतूक नियंत्रकावर अद्याप कारवाई करण्यात आलेली दिसून येत नाही. नागरिकांना दमदाटी करणाऱ्या मुजोर वाहतूक नियंत्रकावर कारवाई कधी होणार…? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एसटी महामंडळाने जेष्ठ नागरिक व सवलतधारक प्रवासी यांना एसटीचे स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक केलेले असताना शिरुर डेपोत अनेकदा नागरीकांना स्मार्टकार्ड वेळेवर मिळत नाही.अनेकदा कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसतात.परंतु कर्मचाऱ्यांकडे आगार प्रमुखांचे याकडे लक्ष नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. त्याचप्रमाणे आगार प्रमुख हे या कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी तर घालत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

unique international school

या बाबतीत एसटीच्या महाव्यवस्थापक वाहतूक व जनसंपर्क अधिकारी, विभागीय नियंत्रक पुणे यांकडे लेखी व ई मेल द्वारे तक्रार करुन ही त्या वाहतूक नियंत्रकावर प्रशासनाने कारवाई केल्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती संबंधित तक्रारदाराला अद्याप मिळालेली नाही. प्रवाशांशी उद्धट भाषेत बोलणा-या, महिला, जेष्ठ नागरिक, पत्रकार यांना अपमानास्पद वागणूक देणा-या वाहतूक नियंत्रकावर कठोर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने नियम व अटींच्या अधिन राहून उपोषण करावे लागेल असा इशारा संबंधित तक्रारदार यांनी दिला आहे. या बाबतीत वरीष्ठ अधिकारी संबंधित वाहतूक नियंत्रकावर कठोर कारवाई करतात की पाठराखण करणार…? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टेबल बदलणे ही कारवाई नव्हे…
नागरीकांना अपमानास्पद वागणूक देणा-या वाहतूक नियंत्रकाचा तात्पुरता टेबल बदली करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांकडून नाव न छापण्याच्या अटीवर देण्यात आली आहे. परंतु, वाहतूक नियंत्रकांना चक्र कामगिरी देण्यात यावी. याबाबत,महाव्यवस्थापक वाहतूक यांचे २ मे २०१९ चे राप/वाहन/चालन/२३८८ परिपत्रक असून, टेबल बदली करणे. हा नियमित कामकाजाचा भाग होत असून संबधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही. तसेच या कर्मचाऱ्याने तुम्ही माझ्या किती पण तक्रारी करा, वरीष्ठ अधिकारी व पेपरचे वरीष्ठ संपादक माझ्या ओळखीचे असुन, मला काय होईल. जास्तीत जास्त दंड होईल. असे वक्तव्य केले होते. त्यामुळे खरंच तसंच घडतय का…? वरिष्ठ अधिकारी संबंधित कर्मचाऱ्याला पाठीशी तर घालत नाहीत ना…? अशा चर्चांना उधाण आले असुन संबधित कर्मचाऱ्यावर शिरुर आगारातीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याने हि कारवाई होत नसल्याचे खाजगीत बोलले जात आहे.

“संबंधित कर्मचाऱ्यावर अपराध कारवाई सुरु आहे. गुन्हा केल्यानंतर कारवाई होतेचं. कर्मचा-याची चुक कीती आहे. गुन्ह्याच स्वरुप त्याच विश्लेषण यानुसार नियमानुसार कारवाई केली जाईल.”
महेंद्र माघाडे
आगार प्रमुख, शिरुर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची…

19 तास ago

हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा रस्त्यावर उतरु; वीज कर्मचारी संघटनांचा एल्गार

बारामती (प्रतिनिधी) किरकोळ वीजबिलाच्या कारणावरुन एका महिला वीज कर्मचाऱ्याचा खात्मा करणाऱ्या आरोपीचा बंदोबस्त करावा. तसेच…

19 तास ago

डॉ अमोल कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? शिंदोडी, गुनाट व चिंचणी ग्रामस्थांचा सवाल…?

शिरुर (तेजस फडके) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या कडक उन्हाळ्याबरोबरच निवडणुकीचे वातावरण तापले असुन डॉ अमोल…

1 दिवस ago

शिरुरमध्ये ‘ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार’ असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असुन माजी खासदार शिवाजीराव…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यातील ‘हेलपाटा’ कादंबरीच्या लेखकाचा विद्यालयात सन्मान!

शिरूर : शिरूर तालुक्यातील 'हेलपाटा' कादंबरीचे लेखक व श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे (न्हावरे) माजी विद्यार्थी तानाजी…

1 दिवस ago

घोलपवाडी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरामुळे सामाजिक व धार्मिक एकोपा वाढेल; चंद्रकांत वांजळे

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) श्री क्षेत्र टाकळी भीमा (घोलपवाडी) येथील बांधण्यात आलेले दक्षिणमुखी मारुती मंदिरामुळे…

3 दिवस ago