शिरूर तालुका

शिरूरमध्ये महिला व तीन वर्षांचा मुलगा बेपत्ता; पतीने दिली शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार

शिरूर ( अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील शिवरत्न सोसायटी, शिक्षक कॉलनी येथून एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह कोणतीही पूर्वसूचना न देता घर सोडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली असून, पोलीस तपास सुरु आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा मंगेश जौंजाळ (वय २६) व तिचा मुलगा सम्यक मंगेश जौंजाळ( वय ३) हे दोघे ३१ मे २०२५ रोजी रात्री ८.०८ ते ११.३० च्या दरम्यान शिरूर येथील आपल्या राहत्या घरातून कुठलीही माहिती न देता बाहेर गेले. त्यानंतर नातेवाईकांकडे शोध घेऊनही न सापडल्याने अद्याप पर्यत दोघेही परत न आल्याने पती मंगेश ताराचंद जौंजाळ यांनी शिरूर पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दाखल केली.

हरवलेली महिला पुजा हिचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे – रंग गोरा, चेहरा उभागोल, नाक बसके, अंगाने मजबूत असून ती निळ्या रंगाचा लेगिंग व जांभळ्या रंगाचा कुर्ता परिधान करून होती. तिच्या पायात गुलाबी रंगाची चप्पल होती. तिच्यासोबत रेडमी कंपनीचे दोन मोबाईल फोन होते – क्र. 8788374409 आणि 7666887044.

हरवलेला मुलगा सम्यक वय वर्षे ३ वर्षे ६ महिने, रंग काळा सावळा, चेहरा गोल, नाक बसके, अंगाने मजबूत असून त्याने टी-शर्ट, हाफपॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचे बूट परिधान केले होते.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात मिसिंग रजिसअन्वये तक्रार दाखल असून, या घटनेचा पुढील तपास पो.ह. उमेश भगत हे करत आहेत. पुजा व सम्यक यांच्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास शिरूर पोलीस ठाणे अथवा तक्रारदार मंगेश जौंजाळ संपर्क क्र. 9359822710 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

3 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

1 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago