मुख्य बातम्या

महसूल सप्ताहात जनतेसाठी उपयुक्त उपक्रमांची रेलचेल – शिरूर तहसील प्रशासनाचा पुढाकार

शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर तालुका प्रशासनाच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, या कालावधीत विविध लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवणे, माहिती उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाबद्दल जनजागृती करणे हा आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग व तालुका प्रशासन शिरूर यांनी सप्ताहाच्या निमित्ताने खालील उपक्रमांची आखणी केली आहे:

महसूल सप्ताहातील मुख्य उपक्रम (दि. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट):

दिनांक कार्यक्रमाचे स्वरूप -१ ऑगस्ट -“महसूल दिन” साजरा करून महसूल सप्ताहाचा शुभारंभ. अधिकार्‍यांचे संवाद, तक्रार निवारण व जनजागृती,२ -ऑगस्ट “शासकीय योजना सन २०२१ पूर्वीपासून राहिवासी असलेल्या कुटुंबांना लाभ” योजनेची माहिती व वाटप,३ ऑगस्ट – पांडव/विरक्तवस्ती नोंदणी व त्यांचा इतर हक्कांसाठी आढावा,४ ऑगस्ट -सीमांकन, फेरसर्वेक्षण, नकाशे आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी विशेष शिबीर,५ ऑगस्ट – “माझं सहाय्यक गाव” उपक्रमांतर्गत ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांच्यात समन्वय बैठक,६ ऑगस्ट- विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न व SOP नुसार अंमलबजावणी,७ ऑगस्ट -M-Sand वाळू उपसा प्रकरणी जनजागृती, नियमनासाठी मार्गदर्शक तत्वांची माहिती आदी विषयांचा समावेश आहे.

या उपक्रमांमुळे महसूल विभागाशी संबंधित सेवा जलद, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळणार असून, नागरिकांचा प्रशासनावर विश्वास वाढेल, असा विश्वास शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी व्यक्त केला. या संपूर्ण सप्ताहात महसूल कार्यालय खुले राहून नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण प्राधान्याने करण्यात येणार आहे. तालुका प्रशासनाने नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

12 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

13 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

17 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

17 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

17 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

17 तास ago