ग्रामीण विद्यार्थिनींसाठी दिलासा ठरणारी ‘सायकल बँक’ योजना सुरू
शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा परिषदशिक्षण विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींसाठी ‘सायकल बँक’हा अभिनव आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. “सायकलचा आधार, भविष्याला आकार” या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ८ वी ते १२ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना शाळेपर्यंत पोहचण्यासाठी मोठ्या अंतरावरून प्रवास करावा लागतो. यामुळे शिक्षणात अडथळा येतो. या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सायकल बँक हे प्रभावी साधन म्हणून पुढे आले आहे.
या उपक्रमाअंतर्गत इच्छुक व्यक्ती, संस्था, कंपन्यांनी नवीन सायकली किंवा जुन्या चांगल्या स्थितीत असलेल्या सायकली दान कराव्यात. त्या सायकली संबंधित विद्यार्थिनींना देण्यात येतील.यामुळे गरजूंना सुलभ, सुरक्षित आणि नियमित शिक्षणासाठी मदतीचा हात मिळेल. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यासाठी पुढाकार घेत समाजाला एक भावनिक आणि सामाजिक आवाहन केले आहे. ज्या व्यक्तींना सायकली दान करायच्या आहेत त्यांनी पंढरी पाटील 9404421427 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिरूर चे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी केले आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…