शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील कवठयाची येमाई देवी म्हणजे नवसाला पावणारी आख्यायिका…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील ग्रामदैवत, कुलदेवी व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत, कुलदैवत असनाऱ्या श्री येमाई देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात शिरुर- मंचर रोडवर कवठे येमाई हे गाव असून गावच्या दक्षिणेस ३ कि. मी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री येमाई देवी देवस्थान एक जागृत देवस्थान असून या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची मनोकामना, मनातील इच्छा पूर्ण होत असल्याने भक्त गणांची येथे नवस फेडण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी होत असते.

कवठे येमाई गावास ऐतिहासिक वारसा लाभलेला असून गावाजवळून वाहणाऱ्या घोडनदीच्या किनारी पुर्वी कवठे हे गाव वसलेले होते, अशी आख्यायिका आहे. कवठे येमाई गावचे वैभव असलेल्या श्री येमाई देवीच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून मंदिर परिसरास तीर्थक्षेत्राचा दर्जाही प्राप्त झाला आहे.

देवीच्या मंदिर परिसरात सभोवताली शेकडो वर्षांपूर्वीचे मोठमोठे वाट वृक्ष, मंदिराच्या उत्तरेस पायऱ्या असलेली ऐतिहासिक बारव (विहीर), मंदिरातील प्रशस्थ गाभारा, समोरचा मोठा सभामंडप,देवालयाच्या सभोवताली तटबंदीचा वाडा, त्यास पूर्वेकडून व उत्तरेकडून असणारी भव्य प्रवेशद्वारे, मंदिरासमोर २ ऐतिहासिक घाट्या (घंटा) असून पूर्वेकडील महाद्वाराजवळ दोन ऐतिहासिक नगारे आहेत.

मंदिराच्या आवारात तीन उंच दीपमाळी असून नवरात्र उत्सव व चैत्र पौर्णिमेस होणाऱ्या यात्रा उत्सवात त्या पेटविल्या जातात. देवीच्या दर्शनासाठी येथे मुक्कामी येणाऱ्या भाविकांच्या राहण्याच्या सोयीसाठी आवारातच खोल्या बांधलेल्या आहेत.

देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस १५ फूट खोल दगडी बांधकामातील श्री महादेवाचे ऐतिहासिक मंदिर असून त्यातील दगडी पिंड व दगडी नंदी हे या मंदिराचे वैशिष्ठय आहे. याच ऐतिहासिक महादेव मंदिरातून ३ कि.मी. अंतरावर असणाऱ्या कवठे गावठाणातील राजवाड्यापर्यंत पूर्वी भुयारी मार्ग होता.

धार, इंदोर, वणी ते दिंडोरीच्या पायथ्यापासून तसेच पुणे, मुंबई, नगर, नाशिक, जळगावसह संपूर्ण राज्यभरातून देवीचे भक्त दर मंगळवारी, नवरात्र उत्सव व चैत्र पौर्णिमेस होणाऱ्या यात्रा उत्सवात श्री येमाई देवीच्या दर्शनासाठी कुटुंबासह मोठ्या संख्येने येत असतात. देवीची पूजा गोरे पाटील करीत आहेत.

दररोज सकाळी ८ व संध्याकाळी ६ वाजता देवीची नियमित आरती व ओलांडा या ठिकाणी होत असतो. विशेषेकरुन भाविकांची यावेळी मोठी उपस्थिती, गर्दी होत असते. वर्षातील प्रत्येक पौर्णिमेस रात्री व आषाढ, श्रावण महिन्यातील मंगळवारी सायंकाळी गावातून श्री येमाई देवीच्या पालखीची सवाद्य मिरवणूक निघत असते. गावातील सर्वच भागातील वाड्यावस्त्यातील लोकांना या पालख्यांचा मान दिला जातो.

नवरात्र काळात श्री येमाई देवीचा मोठा उत्सव येथे साजरा करण्यात येतो. होम – हवन, भजन व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने साजरे करण्यात येतात. वार्षिक पिकपाण्याचा अंदाज घेण्यासाठी जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेस सायंकाळी मंदिरासमोर असणारी सुमारे १२५ किलोग्रॅम वजनाची मोठी दगडी गोटी १३ जणांच्या उजव्या हाताच्या मधल्या एकच बोटाच्या साहाय्याने उचलली जाते.

हा मान पिढ्यानपिढ्या मुंजाळवाडी ग्रामस्थांना आहे. येथील श्री येमाई देवी देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असल्याने मंदिर परिसराचे चांगल्या प्रकारे सुशोभीकरन होऊन कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे.

कवठे येमाई (ता. शिरुर) येथील तीर्थक्षेत्र श्री येमाई देवी देवस्थान हे पुण्यापासून ७० कि.मी. शिरुर पासून २७ कि.मी.मंचरपासून ३५ कि.मी. तर राजगुरुनगर (खेड) पासून ४५ कि.मी. व कवठे येमाई गावातून ३ कि.मी. अंतरावर हे जागृत देवस्थान आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

12 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago