क्राईम

लग्नाचा तगादा लावला म्हणून गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बोलावलं अन्…

राजस्थान: लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रियकराने आपल्याच प्रेयसीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधून उघडकीस आली आहे. नराधम प्रियकराने प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने अज्ञात स्थळी बोलावलं. तिथे हजर असलेल्या आरोपीच्या 2 मित्रांनी पीडितेवर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केलाय. तिघेही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणीचे एका अरबाज धोबी नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. अरबाजने पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून तिचं लैंगिक शोषण सुरू केलं. पीडितेने लग्नासाठी विचारणा केली असता आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. जेव्हा पीडितेने ही गोष्ट कुटुंबीयांना सांगण्याची धमकी दिली तेव्हा अरबाजने तिला अज्ञातस्थळी बोलावलं. अरबाजच्या सांगण्यावरुन पीडिता त्याला भेटण्यासाठी गेली असता, तिथे उपस्थित असलेल्या इतर दोन आरोपींनी तिचं अपहरण करत जंगलात नेलं. त्याठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला.

धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा आरोपीचे मित्र तरुणीवर बलात्कार करत होते तेव्हा आरोपी अरबाज त्यांना प्रोत्साहित करत होता. बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेला तिथेच सोडून दिलं. त्यानंतर पीडितेने आपलं घर गाठत कुटुंबीयांना आपबिती सांगितली. यानंतर पीडितेने तिच्या कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तिनही आरोपींविरोधात अपहरण तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाल्याची माहिती आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

3 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

6 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

8 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago