शिरूर तालुका

शिक्रापूरच्या आठवडे बाजारात युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे आठवडे बाजारात बटाट्याच्या गोणीवर पाणी सांडल्याने युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नाथा बबन उमाप, प्रदीप दगडू उमाप, मंगेश फुलमोगरे, सुमित संपत नरके या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आठवडे बाजारात एक महिला बटाटे विक्रीसाठी बसलेली असताना सागर भुजबळ हा युवक बाजारामध्ये पिण्याच्या पाण्याचे जार देण्यासाठी आला असताना जार मधील पाणी सदर महिलेच्या बटाट्याच्या गोणीवर पडल्याने महिलेचा मुलगा मंगेश फुलमोगरे याने सागर यास शिवीगाळ, दमदाटी केली दरम्यान त्यांच्यात वाद झाला.

यावेळी मंगेश याने फोन करुन काही युवकांना बोलावून घेतले असता नाथा उमाप, प्रदीप उमाप, सुमित नरके सदर ठिकाणी आले त्यांनी सागर यास शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करत जखमी केले. यावेळी सागरची बहिण भांडणे सोडवण्यास आली असता मारहाण करणाऱ्या लोकांनी तिला सुद्धा शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली.

याबाबत सागर रवींद्र भुजबळ (वय ३१) रा. पांढरी तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नाथा बबन उमाप, प्रदीप दगडू उमाप, मंगेश फुलमोगरे तिघे रा. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे, सुमित संपत नरके रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हडागळे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

37 मिनिटे ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago