शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रोड लगत असलेल्या गोविंदधाम येथील विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रोड लगत असलेल्या गोविंदधाम येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने येथील शेतकरी कोंडीबा भुजबळ हे सदर ठिकाणच्या विद्युत रोहित्राची पाहणी करण्यासाठी गेले असता येथील विद्युत रोहित्र जमिनीवर पडलेले तसेच त्याची सर्व ऑईल खाली सांडलेले तसेच रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या पट्ट्या चोरीला गेल्याचे दिसून आले.
त्यामुळे विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरुन नेल्याचे निदर्शनास आल्याने कोंडीबा भिकोबा भुजबळ (वय ८५) रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष मारकड हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…