Categories: इतर

‘बेटी बचाओ’ ही भाजपाची पोकळ घोषणा, बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजपा उभा

उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन

मुंबई: उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील. असा इशारा मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिला आहे.

उन्नाव प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने सांताक्रूज ते चर्चगेट दरम्यान लोकलने प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे प्रभारी पवन मजीठिया, प्रदेश सरचिटणीस संतोष गुप्ता, उत्तर-पश्चिम जिल्हाध्यक्ष शिव जतन यादव, दक्षिण-मध्य जिल्हाध्यक्ष प्रज्ञा धावळे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवास करत प्रवाशांशी थेट संवाद साधला व उन्नाव बलात्कार प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. या प्रकरणात सरकारची भूमिका किती लाजिरवाणी आहे हे जनतेसमोर मांडले.

यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या भाजपच्या पोकळ घोषणा आहेत. भाजपचा खरा चेहरा उन्नाव प्रकरणाने उघड झाला असून भाजप सत्तेच्या जोरावर सेंगरसारख्या बलात्कार्‍यांना वाचवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी खरोखरच संवेदनशील, संविधानिक आणि न्यायप्रिय भूमिका घेणे गरजेचे असताना भाजप सत्तेचा गैरवापर करून आरोपींना संरक्षण देत आहे. या प्रकरणात आरोपीला दिलासा देणाऱ्या सर्व निर्णयांचा निषेध करत, पीडितेला पूर्ण न्याय मिळेपर्यंत युवक काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या जनजागृती मोहिमेदरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणाचा तीव्र निषेध केला. महिलांच्या सुरक्षेच्या नावाने केवळ जाहिरातबाजी करणारा भाजप प्रत्यक्षात आरोपींच्या बाजूने उभा राहतो, हा विरोधाभास जनतेपर्यंत पोहोचवणे हाच या आंदोलनाचा उद्देश होता, असे झीनत शबरीन म्हणाल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

12 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

12 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

12 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

21 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

21 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

21 तास ago