Categories: इतर

देव तारी त्याला कोण मारी! कार आणि ऑटोचा जबरदस्त अपघात…

तेलंगना: रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना तुमची एक चूक तुमच्यासाठी घातक ठरु शकते. हे सर्व माहीत असूनही अनेकदा लोक रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन उद्यानात चालत असल्यासारखे रस्त्यावरुन चालत असतात. रस्त्यावरील अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. मात्र, अनेकदा लोकांचे नशीब त्यांना त्यावेळी साथ देते, त्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओने हे सिद्ध केले आहे की, तुम्ही रस्त्यावर जितके सावध राहाल तितके कमी आहे. अपघात दरम्यान आलेले अनुभव कधी जीवनाचा चांगलाच धडा देतात. आता ही क्लिपच बघा, एक कार ऑटोला धडकते आणि मध्येच एक महिला येते. हा अपघात पाहून महिलेचा जीव वाचेल असे वाटत नाही, मात्र नशीब या अपघातातून महिलेला वाचवते. अवघ्या १४ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक महिला रस्त्यावरून जात आहे, त्याचवेळी एक बेकायदेशीर कार येऊन तिथे उभ्या असलेल्या ऑटोला धडकते.

या अपघातात कार आणि ऑटो या दोन्हीच्या मधोमध एक महिला असून ती दोन्ही वेगवेगळ्या बाजूने पडल्याने महिला त्या दोघांमधून बाहेर पडते आणि तिचा जीव थोडक्यात वाचतो. ही धक्कादायक क्लिप तेलंगणाचे एडीजीपी व्हीसी सज्जनार यांनी ट्विटर हँडलवर शेअर केली आहे. या व्हिडीओला ३५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं असून कमेंट करुन प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘एका महिलेचा जीव थोडक्यात वाचला.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘या कारवाल्यावर कडक कारवाई व्हायला हवी.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘अशा लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ नये.’ याशिवाय इतर अनेक युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

7 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

7 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

12 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

16 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 दिवस ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 दिवस ago