Janabai Pawar
वाघाळेः वाघाळे गावचे पस्तीस वर्षे पोलिस पाटील पद भुसविलेले खंडेराव पवार यांच्या पत्नी जनाबाई खंडेराव पवार (वय ८६) यांचे वृद्धपकाळाने आज (शनिवार) पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
विकास सोसायटीचे माजी संचालक भाऊसाहेब पवार, आदर्श शिक्षका शोभा पवार / भोसले, आदर्श शिक्षक अशोक पवार, आदर्श शिक्षक संदिप पवार यांच्या त्या मातोश्री होत. जुन्या पिढीतील जनाबाई पवार यांची गावामध्ये मामी म्हणून ओळख होती. प्रेमळ स्वभाव असलेल्या मामींना धार्मिक क्षेत्राची आवड होती.
मुलांना उच्च शिक्षण दिले आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, दशक्रिया विधी सोमवार दिनांक १२/०९/२०२२ रोजी वाघेश्वर मंदिर परिसर वाघाळे येथे होणार आहे.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…