इतर

भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध; खेड तहसीलदार यांना निवेदन सुपूर्द

आळंदी (प्रतिनिधी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार (दि 24) एका कार्यक्रमात पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या असा भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संवाद बैठकीत सल्ला दिला. त्यांच्या या वक्तव्याचा हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच राजगुरुनगर (खेड) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे वतीने अप्पर तहसीलदार स्नेहा सिंदे व महसूल नायब तहसीलदार आर बि बिजे यांनी हुतात्मा राजगुरु पत्रकार संघ खेड अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे हस्ते निवेदन स्वीकारले.

 

यावेळी संघाचे उपाध्यक्ष एम डी पाखरे, खजिनदार सुनील बटवाल, सदस्य अनिल जोगदंड, बद्रीनारायण घुगे, खेड तहसीलदार कार्यालयातील शैलेश कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. यावेळी देण्यात असलेल्या निवेदनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करुन त्यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली असल्याचे हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago