Categories: इतर

शिक्रापूरच्या हॉटेल चालकाच्या दुचाकीसह पैसे व मोबाईल चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथे एका हॉटेल चालकाच्या घरात प्रवेश करत मोबाईल, रोख रक्कम सह दुचाकी चोरी केल्याची घटना घडली असून सदर प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 2 अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथे सोमनाथ ढमढेरे यांचे श्रीराम मिसळ हॉटेल असून त्यांचे घर व हॉटेल मध्ये एकच खिडकी आहे. रात्री ढमढेरे हे घरात झोपलेले होते. सकाळच्या सुमारास उठल्यानंतर त्यांनी त्यांचा मोबाईल व 30 हजार रुपये असलेले पाकीट पाहिले असता त्यांना मोबाईल व पाकीट दिसले नाही. त्यावेळी ते बाहेर आले असताना घराबाहेर लावलेली एम एच १२ एन के ७७३० ही दुचाकी देखील नसल्याचे त्यांना दिसले.

त्यामुळे त्यांनी हॉटेल व घराला लावलेले CCTV तपासले असता रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी घरात येत घरातून 30 हजार रुपये असलेले पाकीट व मोबाईल तसेच एम एच १२ एन के ७७३० ही दुचाकी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

याबाबत सोमनाथ काकासाहेब ढमढेरे (वय ४६) रा. बजरंगवाडी (ता. शिरूर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी 2 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

4 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

4 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

6 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

22 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago