Categories: इतर

अलिबाग जिल्हा रुग्णालयासाठी नवीन अद्ययावत इमारत उभारणार; रविंद चव्हाण

मुंबई: अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९८०-८१ मध्ये करण्यात आले आहे. या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले असून त्याची दुरूस्ती आणि पुनर्बांधणी आवश्यक आहे. यामुळे रूग्णालयाची सहा मजल्यांची नवीन इमारत उभारण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती व सुशोभिकरणाचे कामासंदर्भात विधानपरिषदेत जयंत पाटील, मनिषा कायंदे, प्रवीण दरेकर, आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी उत्तर देताना मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयाच्या जागेतच नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. महाविद्यालय प्रशासन आणि जिल्हा रुग्णालयात झालेल्या करारानुसार तीन वर्षापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाला रुग्णालयातील रुग्णसेवा, पायाभूत सुविधा उपयोगात आणता येणार आहेत. कराराच्या तीन वर्षानंतर वैद्यकीय महाविद्यालय उसर येथे होईल. तोपर्यंत रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संरचनात्मक परीक्षणानुसार इमारतीचे डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. इमारतीचे 58 खांबांपैकी 17 खांब काढून पूर्णपणे नवीन करण्यात आले आहेत. इतर खांबांचे काम पुढील काळात करण्यात येणार आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सहा मजल्यांची इमारत बांधण्यात येईल, अशी माहितीही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

नवीन इमारतीची गरज निश्चितच आहे. नवीन इमारतीला लागणारे 12 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. परंतु ही नवीन इमारत बांधण्यासाठी किमान 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो, यासाठी इथली संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, तेथील रुग्णांना आणि मेडिकल विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, या सगळ्या गोष्टींचा विचार करून शासन सकारात्मक पद्धतीने पुढील भूमिका मांडेल, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या…

6 तास ago

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिरुर (तेजस फडके) अजित पवार हे फार मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे.…

6 तास ago

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा…

22 तास ago

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक…

24 तास ago

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

3 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

3 दिवस ago