parmeshwar-botkar-kawthe
कवठे येमाई (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता.शिरूर) येथील हिलाळ वस्ती येथे शेतीला पाणी देत असताना परमेश्वर दत्तात्रय बोटकर (वय २१) या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. शिरूर तालुक्यातील म्हसे बु येथील महिलेवर हल्ला झालेली घटना ताजी असतानाच हा हल्ला झाला आहे. बिबट्याचे पशुधनाबरोबर मानवावर होणारे हल्ले वाढले असून, वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून जोर धरत आहे.
बिबट्यांच्या दहशतीने शाळकरी मुले, महिला व शेतकरी यांच्यामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. बोटकर हा युवक मंगळवारी (ता. ६) संध्याकाळी सहाच्या सुमारास शेतीला पाणी देत होता. यावेळी अचानक बिबट्याने पाठीमागून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने परमेश्वरच्या छातीवर पंजा मारला व डाव्या पायाला जबड्यात पकडले. परंतु त्याने न घाबरता बिबट्याचा सामना करत प्रतिकार केला. त्याने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने शेजारील ऊसात पोबारा केला. घटनास्थळी वनपाल गणेश पवार, वनरक्षक नारायण राठोड, वन कर्मचारी हनुमंत कारकुड , कवठे येमाईचे उपसरपंच उत्तम जाधव, युवा नेते अविनाश पोकळे, अतुल हिलाळ, सावकार शेटे यांनी भेट दिली.
या परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे बिबट्यांना नैसर्गिक अधिवास मिळाला आहे. जनतेने बिबट्यापासून सावध राहण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. शेतीला पाणी देण्यासाठी एकट्याने जाऊ नये. सोबत मोबाईल किंवा रेडिओ नेऊन त्याच्यावर मोठ्या आवाजात गाणे वाजवावे, सोबत काठी बाळगावी. तसेच फटाके वाजवावे.
– वनरक्षक नारायण राठोड.
बेट भागात बिबट्यांची संख्या वाढल्याने पशुधनाबरोबरच मनुष्यावर हल्ले वाढू लागले आहेत. शासनाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा या परिसरातील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होणार आहे. यापुढील काळात कोणाच्या जीवितास धोका झाल्यास त्यास सर्वस्वी वनखाते जबाबदार रहाणार आहे. लवकरच या संबंधी मी वन खात्यातील वरिष्ठांशी बोलणार आहे.
– माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे
या तरुणाच्या धाडसाचे कौतुक करावे तितके थोडे आहे, त्याने न डगमगता बिबट्याचा सामना केला. या तरुणाच्या जखमा बऱ्या होईपर्यंतच्या उपचाराची जबाबदारी वनविभागाने घ्यावी.
– सरपंच सुनीता बबनराव पोकळे
कोरेगाव भीमा येथे तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद…
निमगाव दुडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार
शिरूर तालुक्याच्या बेट भागात तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…