क्राईम

काशिद समुद्रात ६ जण बुडाले, चौघांना वाचवलं; एकाचा मृत्यू, १ बेपत्ता…

औरंगाबाद: कन्नड येथील सानेगुरुजी विद्यालयातील विद्यार्थी दोन विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रात बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. त्यापैकी, एका मुलाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलाचा कसून शोध सुरू आहे. येथील समुद्रात एकूण ५ जण बुडाले होते, त्यापैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा अद्यापही बेपत्ता आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घटना घडली. याबाबत माहिती मिळताच स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना घटनास्थळी धाव घेतली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कन्नड तालुक्यातील ७० विद्यार्थी, मुले-मुली हे पर्यटनासाठी रायगड जिल्ह्यात आले होते. त्यांच्यासमवेत ५ शिक्षकही आहेत. मुरुड जंजिरा येथील काशीद समुद्रकिनारी हे सर्वजण गेले असता, यातील ६ मुले समुद्रात बुडाली. सुदैवाने ४ मुलांना वाचवण्यात यश आले असून एक मुलगा बेपत्ता आहे, तर एकाचा मृतदेह आढळून आला आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रणव कदम याचा मृत्यू झाला असून रोहन बेडवाल अद्यापही बेपत्ता आहे. सायली राठोड, कृष्णा पाटील, तुषार हरिभाऊ वाघ, रोहन महाजन यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, बुडालेल्या विद्यार्थ्यांवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

7 दिवस ago