क्राईम

मित्रानेच केला मित्राचा खून, अवघ्या १२ तासांत लावला खूनाचा छडा

वाघोली: रस्ता चुकल्याच्या कारणावरून कंटेनर चालक व क्लीनर यांच्या झालेल्या वादातून अवजड हत्याराने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीला लोणीकंद तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे अवघ्या 12 तासात जेरबंद केले आहे. शमशुल अली अहमद खान (वय २६) रा. उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर शहजाद अब्दुल कयूम अहमद (वय २६) रा. उत्तरप्रदेश असे खून झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत तुळापुर-लोणीकंद रोडवर (दि. २६) वढू बुद्रुक (ता. हवेली) गावचे हद्दीत हॉटेल सिताईचे समोर कंटेनर (डीएन ०९ आर ९०५८) मध्ये एक इसम जखमी व रक्ताचे थारोळ्यात बेशुध्द अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेवून सदर व्यक्तीस पोलिसांनी उपचारासाठी ससून हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. व्यक्तीच्या डोक्यात अवजड हत्याराने मारहाण करुन त्याचा खून केला असल्याचे निष्पन्न झाल्याने (दि. २७ जानेवारी) कंटेनर मालकाच्या तक्रारीवरून लोणीकंद पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेणेकामी दोन पथके रवाना केली होती. तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव व त्यांचे पथकाने अधिक तपास केला असता गुजरात येथील व्यक्तीकडे कंटेनरवर क्लीनर म्हणून काम करत असलेल्या संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.

गुजरात येथील संजय रामफल यांच्या कंटेनरवर आरोपी क्लीनर तर मयत ड्रायव्हर म्हणून काम करत होता. दोघेही मित्र होते. परंतु रस्ता चुकल्याचे कारणावरुन दोघांमध्ये वाद निर्माण झाला. झालेल्या वादातून आरोपी शमशुल याने अवजड हत्याराने मारहाण केली यामध्ये शहजाद याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून पोलीस अंमलदार समीर पिलाने यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणामुळे अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव हे करीत आहेत.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त शशिकांत बोराटे, सहा पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे पोलीस अंमलदार कैलास उगले, सारंग दळे, अमित देशमुख, बाळासाहेब सकाटे, कैलास साळुंके, सागर जगताप, विनायक साळवे, स्वप्निल जाधव, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे, समीर पिलाणे, पांडुरंग माने यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न; ‘बाप्पाचा कट्टा’चा ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रम सुरू!

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून…

7 तास ago

हाता-पायांना सतत घाम का येतो,कारणे काय? वेळीच करा उपाय

पोटादुखी, अपचन, डिहायड्रेशनची समस्या यांसारखे आजार उद्भवतात. उन्हामुळे त्वचा टॅन होणे, सतत तहान किंवा लघवीला…

7 तास ago

गुडघेदुखीवर पारंपरिक, घरगुती आणि अत्यंत असरदार उपाय,

जसं वय वाढतं तसं गुडघेदुखी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. आजकाल ही समस्या…

7 तास ago

पूर्णेकर हत्या प्रकरणाचे राजकारण नको; दोषींवर कठोर कारवाई करा; एकनाथ शिंदे

मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा माझ्याकडे; निष्पक्ष चौकशीचे पोलिस आयुक्तांना निर्देश ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना…

7 तास ago

विधान परिषद निकालाने भाजपला जनतेचा इशारा; महायुतीच्या परतीचे दिवस सुरु;  विजय वडेट्टीवार

‘संघभूमीतही भाजपचा प्रभाव दिसला नाही’; ओबीसी आरक्षणावरून सरकारला घेरले, १ नोव्हेंबरच्या दिल्ली आंदोलनाची घोषणा नागपूर:…

7 तास ago

‘भ्रष्टाचाराच्या मलईसाठी गुजरातच्या कंपनीला सह्याद्री विकला’; हर्षवर्धन सपकाळ

कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीवरून काँग्रेस आक्रमक; वनसंपदेच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा कर्जत : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन…

7 तास ago