क्राईम

जांबुत मध्ये एक बिबट्या अखेर जेरबंद

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरुर) येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सचिन जोरी आणि पूजा नरवडे यांच्या घटनेनंतर वनविभाग प्रशासनान मात्र खडबडून जागे झाले. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची मोठी फौज या भागात ठाण मांडून होती. यावेळी शनिवार (दि.२२) रोजी पहाटे मादी संवर्गातील 7 ते 8 वर्षे वयोमान असणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून पूजा नरवडेचा मृत्यू झालेल्या घटनास्थळावरुन अंदाजे 400 मीटर अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद झाला.

पकडण्यात आलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात ठेवण्यासाठी परवानगी मिळाली. सदर ठिकाणी त्याची रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली. तसेच या भागातील बिबट हल्ल्यांचे प्रमाण लक्षात घेता उर्वरित इतर बिबट्यांना देखील पकडण्याच्या दृष्टीने वनविभागाचे प्रयत्न चालू आहेत. तसेच परिसरात इतरत्र बिबटे निदर्शनास आल्यास पिंजरे लावणार असल्याचे म्हसेकर यांनी सांगितले. या आधी देखील सचिन जोरी यांचा मृत्यू झाल्यानंतर या भागात पिंजरे लावण्यात आले होते. त्यावेळी जोरीमळा येथे एका बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले असून या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांना लपण वाढलेली आहे.

सध्या अनेक ऊसतोड मजूर या भागात ऊसतोडणीसाठी वास्तव्यास येत असून शेतांच्या कडेला त्यांचा संसार उघड्यावर असतो तसेच त्यांच्याकडे अनेक लहान बालके असतात त्यामुळे ऊस तोड मजुरांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे.

मागील 3 दिवसांपूर्वी जांबूत- वडनेर खुर्द रस्त्यावर सचिन जोरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनास्थळावर जांबूत येथून आठवडे बाजार करुन परतणाऱ्या युवकाच्या दुचाकीवर देखील बिबट्याने हल्ला केला असून यामुळे शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला असल्याने 2 बिबट्यांना जेरबंद करण्यात जरी वनविभागाला यश आले असले तरी इतर बिबट्यांची संख्या पाहता या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे टाकळी हाजीचे माजी सरपंच दामू घोडे यांनी सांगितले. यावेळी घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, जांबूतचे सरपंच दत्तात्रय जोरी, सिताराम म्हस्के यांचेसह वनविभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर बिबट्याला जेरबंद करण्यात आल्याने ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी इतर बिबट्यांना देखील लवकर जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी करत या कारवाईमुळे वनविभागाचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

2 तास ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

2 तास ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

16 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

23 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

23 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

23 तास ago