क्राईम

पुणे नगर महामार्गांवर ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने 12 ते 14 प्रवासी जखमी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावर कारेगावच्या हद्दीत व्हर्लपूल कंपणी समोर मुंबई वरुन औरंगाबादकडे जाणारी हमसफर कंपनीची ट्रॅव्हल्स नं. एम एच 09 सी व्ही 2080 हि पहाटेच्या पाचच्या सुमारास उलटल्याने बसमधील 12 ते 14 प्रवासी किरकोळ तर काही गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक पळुन गेला असुन याबाबत मंगलसिंग जसवंत सिंग ताजु (वय 30) सध्या रा. 201 स्मृती अपार्टमेंट, कदमवाडी कलिना, मुंबई मूळ रा.भूषण पार्क, गट नंबर 83, देवना लाईन रोड, औरंगाबाद यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पुणे-नगर महामार्गावर मुंबई वरुन औरंगाबादकडे जाणारी भरधाव वेगात असलेली हमसफर कंपनीची ट्रॅव्हल्स ड्रायव्हरच्या चुकीमुळे कारेगावच्या हद्दीत व्हर्लपूल कंपणी समोर उजव्या बाजूस पलटी झाली. यात 12 ते 14 प्रवासी किरकोळ तसेच गंभीर जखमी झाले असुन यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानानंतर ट्रॅव्हल्स चालक मात्र पळुन गेला. रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील पोलिस हवालदार संतोष पवार हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

5 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

5 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

8 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

9 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

9 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

9 तास ago