crime
शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याचे नजीक असलेल्या पंजाबी ढाब्यासमोरुन एका नवीन कंटेनरची चाशी चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर चाकण रस्त्याने सरबजित सिंग यांच्या ट्रान्सपोर्टचा चालक साहिल लाहुरी हा त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीच्या कंटेनरची जे एच ०५ ए ७८५६ हा तात्पुरता नंबर असलेली नवीन बारा टायर असलेली चाशी घेऊन पनवेल येथे देण्यासाठी चालेलला असताना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जातेगाव खुर्द येथील खालसा पंजाबी ढाबा येथे चहा पिण्यासाठी थांबला होता. काही वेळाने चहा पिऊन पुन्हा चालक सदर कंटेनर जवळ आला असता त्याचा कंटेनर गायब झाल्याचे दिसून आले.
याबाबत सरबजित बलदेव सिंग (वय ४६) रा. टाटा नगर गोलमुरी ता. गोलमुरी जि. सिंबूम झारखंड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भरत कोळी हे करत आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…