शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे पाणी विक्रीच्या वादातून एका इसामाला बेदम मारहाण करत त्यांच्या वाहनाला ट्रॅक्टरने धडक देऊन कारचे नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महेश सुदाम भुजबळ व राजेंद्र सुदाम भुजबळ या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील संजय गवारी यांचा पाणी विक्रीचा व्यवसाय असून ते १४ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास तळेगाव ढमढेरे ते टाकळी भीमा हद्दीमध्ये पाणी विक्री करत असताना त्या ठिकाणी महेश भुजबळ व राजेंद्र भुजबळ हे सदर ठिकाणी आले व तू येथे पाणी टाकायचे नाही असे म्हणाल्याने त्यांच्या मध्ये वाद झाला. त्यावेळी दोघांनी संजय यांना शिवीगाळ, दमदाटी करत बेदम मारहाण केली तसेच यावेळी पुन्हा येथे दिसला, तर जीवे ठार मारील, अशी धमकी दिली. तसेच यावेळी शेजारी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरने संजय यांच्या कारला जोरात धडक देऊन कारचे सुद्धा नुकसान केले.
याबाबत संजय उत्तम गवारी (वय ४४) रा. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी महेश सुदाम भुजबळ, राजेंद्र सुदाम भुजबळ दोघे रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…