शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील बेट भागात चोऱ्यांचे सत्र सुरु असून नुकतीच पिंपरखेड येथे जबरी चोरी झाली आहे. तर कवठे येमाईच्या काळुबाई नगर येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २१) रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान मौजे काळुबाईनगर, कवठे येमाई गावाचे हद्दीत फिर्यादी मनोहर वसंत नरवडे यांचे रहाते घरासमोर पार्क केलेली मोटारसायकल कोणीतरी ‘अज्ञात चोरटयाने स्वतःचे फायदयाकरीता मुद्दाम लबाडीचे इरादयाने चोरुन नेली आहे. म्हणुन अज्ञात चोरट्याविरुध्द मनोहर नरवडे यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार अनिल आगलावे हे करत आहे.
वाहनमालकांनी आपल्या टु व्हिलर, फोर व्हिलर गाड्या सुरक्षित ठिकाणी पार्क कराव्यात. शक्यतो सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीखाली आपल्या गाडया पार्क कराव्या. रात्रीच्या वेळी सशंयास्पद हालचाली वाटल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा.
सुनिल उगले (पोलिस उपनिरीक्षक, शिरुर)
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…
आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…