मुख्य बातम्या

शिरुरमध्ये पावामध्ये घुशीची लेंडी आढळल्याचे प्रकरण: अन्न सुरक्षा विभागाने पाहणी करत केली बेकरी सील

शिरूर (अरुणकुमार मोटे): शहराच्या रामलिंग रोड परिसरातील ‘सिरवी बंधू मिठाईवाले’ या सुप्रसिद्ध बेकरीतून विकत घेतलेल्या पावाच्या लादीत घुशीची घाणेरडी लेंडी आढळल्याने शिरूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अन्न सुरक्षेबाबतचा प्रशासकीय हलगर्जीपणा आणि बेकऱ्यांमधील अस्वच्छतेचे गंभीर वास्तव यानिमित्ताने उघड झाले आहे.

ही धक्कादायक घटना (दि. २०) जुलै रोजी सतीष तागड यांच्याबाबतीत घडली. त्यांनी बेकरीतून दोन पावाच्या लाद्या विकत घेतल्या असता, त्यामध्ये एका लादीत चक्क घुशीची लेंडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ संबंधित बेकरीत धाव घेतली आणि हा प्रकार इतर ग्राहकांसमोर उघड केला. स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की,”शिरूर व परिसरातील इतर बेकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून, अन्न प्रशासन विभाग केवळ कागदोपत्री सक्रिय आहे.”

हॉटेल्स आणि बेकऱ्यांमध्ये शिळे, बिनधास्त व साठवलेले पदार्थ खुलेआम ग्राहकांना दिले जात आहेत.या घटनेची गंभीर दखल घेत अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी तात्काळ मन्सूर बेकरी, शनी मंदिर शिरूर येथे बेकरीची पाहणी करून ती सील केली आहे. तसेच बेकरीचे फूड लायसन्स देखील रद्द करण्यात आले आहे.या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी, “फक्त एका बेकरीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण शिरूर तालुक्यातील बेकऱ्यांची व हॉटेल्सची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी आता होऊ लागली आहे.

शिरूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये केवळ बेकऱ्यांमध्येच नव्हे तर दुध भेसळ, हॉटेल्समधील साठवलेले खराब अन्न, आणि अस्वच्छ स्वयंपाकघरांचेही प्रमाण वाढले आहे. या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असून, यामागे अन्न सुरक्षा यंत्रणेची ठोस कारवाई नसल्याचा आरोप केला जात आहे. जर प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई केली नाही, तर नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

अन्न प्रशासन यंत्रणेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नसल्याचे वारंवार सिद्ध होत असल्याने, आता संपूर्ण तालुक्यात विशेष मोहीम राबवून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. ही घटना शिरूरसारख्या वाढत्या शहरात अन्न सुरक्षेच्या ढासळलेल्या व्यवस्थेचे गंभीर चित्र स्पष्ट करते. आता अन्न प्रशासन प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

6 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

6 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

10 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

10 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

10 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

10 तास ago