क्राईम

बाप लेकीच्या नावाला काळिमा फासणारी घटना, नराधम पित्याला ठोकल्या बेड्या…

वर्धा: बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना वर्धा जिल्ह्यात घडली असून परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे.

नराधम बाप 17 वर्षीय मुलीवर सलग 3 वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याची ही धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावात घडली आहे. या संतापजनक घटनेतील नराधम पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा नराधम बाप मुलीवर सलग तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता. शिवाय मुलीवर करत असलेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून नराधम आरोपी हा पत्नीलाही मारहाण करायचा. मात्र, सततचा अत्याचार सहन न झालेल्या मुलीने अखेर हा सर्व प्रकार आपल्या शिक्षिकेला सांगितल्यामुळे हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.

12 वी मध्ये शिकत असलेल्या या पीडित मुलीने याबाबतची माहिती तिच्या शाळेतील शिक्षिकेला सांगितली. शिक्षिकेने घटनेचे गांभीर्य पाहून तत्काळ जिल्हा बाल संरक्षण समिती आणि चाईल्ड लाईन केंद्राला याबाबत माहिती दिली. त्यांनी लगेच अल्लीपूर पोलीस ठाणे गाठून याबाबत माहिती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तत्काळ या प्रकरणात नराधम बापाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल गाडे करत आहेत. मात्र, या घटनेमुळे जिल्ह्याभरात संतापाची लाट उसळली असून नराधम बापाला कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 वर्षीय मतिमंद युवतीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असताना आता ही बातमी समोर आली आहे. पीडित मतिमंद युवती घरी एकटी असल्याचा फायदा घेत नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. हा निंदनीय प्रकार पीडित युवतीच्या भावाच्या लक्षात येताच त्याने आष्टी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावरुन 25 वर्षीय आरोपी अतुल सुरेश बोरीवार याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

17 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

17 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago