मुंबई: संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करु आणि त्यांचा पराभव करु, असे स्वप्न भाजपचे लोक बघत असून त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे, असे थेट प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करु असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते त्या वक्तव्याचा समाचार महेश तपासे यांनी घेतला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ राजकारणाने नव्हे तर समाजकारणाने बांधलेला आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांचा परिचय राजकारणीपेक्षा एक समाजकारणी म्हणून जास्त आहे. राजकारण करण्याची भूमिका भाजपची तर समाजकारणाचे बाळकडू खासदार सुप्रियाताई सुळे यांना लहानपणापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि आदरणीय पवारसाहेबांच्या प्रेरणेतून मिळाले आहे याची आठवणही महेश तपासे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना करुन दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे नव्यानेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले असल्याने कार्यकर्त्यांसमोर बोलावं लागतं शिवाय मिडियासमोर बोललं तर बातमी होते परंतु संपूर्ण महाराष्ट्राला खासदार सुप्रियाताई सुळे यांचे काम कसे आहे याचा परिचय आहे, असेही महेश तपासे म्हणाले.
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कामाची प्रशंसा करणारे अनेक भाजप खासदार आहेत. शिवाय सलग सातवेळा संसदरत्न, १६ व्या लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी संसद महारत्न आणि १७ व्या लोकसभेतील कामगिरीसाठी संसद विशिष्ट रत्न या पुरस्काराने खासदार सुप्रियाताई सुळे यांचा सन्मान करण्यात आला आहे आणि तेही मोदी राजवटीत अशी आठवणही महेश तपासे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना करुन दिली.
बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…
मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…