क्राईम

मोठी बातमी! फसवणूक केल्याप्रकरणी सैराट फेममधील हा अभिनेता अडचणीत

नगर: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आरोपींनी मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी 5 लाखांची मागणी केली होती. अखेर आरोपींच्या कुकृत्याचा उलगडा झाला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात ‘सैराट’ या जगप्रसिद्ध चित्रपटात प्रिन्सची भूमिका साकारलेला अभिनेता सुरज पवार याचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटकेतील आरोपींनीच सुरज पवार याच्याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे सुरज पवारलाही अटक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील आरोपी दत्तात्रय क्षिरसागर (रा. नाशिक), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे (दोघेही रा. संगमनेर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींवर भादवि कलम 420, 465, 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

32 मिनिटे ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

17 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

21 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

21 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

21 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

21 तास ago