शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे, पिराची वस्ती येथून एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून ५०,००० रुपयांची म्हैस अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री. दिपक सोपान रणसिंग (वय २८), व्यवसाय शेती, रा. निमगाव दुडे, पिराची वस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २१ जून २०२५ रोजी रात्री १२.०० ते ३.०० या वेळेच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोरील छप्पराच्या गोठ्यामधून एक काळ्या रंगाची, दिल्ली जातीची, बारीक शिंगाची, वयाने सुमारे दोन वर्षांची म्हैस अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. सदर म्हैस ही पिवळ्या दोरीमध्ये गुलाबी रंगाचे पाईप तोंडाला बांधलेली असून तिच्या नाकावर खडडा आहे. चोरीला गेलेल्या म्हशीची अंदाजे किंमत ५०,००० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
शेतकरी दिपक रणसिंग यांना २५ जून रोजी दुपारी २.५० वाजता ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार अज्ञात चोरट्याने मुददामपणे लबाडीच्या हेतूने स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी ही चोरी केल्याचे सांगण्यात आले आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पो.ह.वा. जगताप यांनी गुन्हा दाखल केला असून पो.ह.वा. आगलावे हे तपास करीत आहेत. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच स्थानिकांच्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे गतिमान केली असून, लवकरच आरोपीचा माग काढण्यात येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…