क्राईम

सणसवाडीत अल्पवयीन युवतीचा बालविवाह, माजी सरपंचांसह चौघांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय युवतीचा बालविवाह केल्याची घटना घडली असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सणसवाडीच्या माजी सरपंच असलेल्या नवरदेव मुलाची आई रोहिणी रवींद्र भुजबळ, नवरदेवाचे वडील रवींद्र बापू भुजबळ, युवतीचे वडील रमेश उर्फ रामदास दिलीप ताम्हाणे, युवतीची आई रेश्मा रमेश ताम्हणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील उद्योजक रवींद्र भुजबळ व सणसवाडीच्या माजी सरपंच रोहिणी भुजबळ यांनी त्यांचा मुलगा केतन याचा विवाह तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर माध्यमिक विद्यालय येथे दहावीचे शिक्षण घेणाऱ्या एका 16 वर्षीय युवतीशी मोठ्या थाटामाटात ४ ऑगस्ट २०२२ रोजी कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय येथे केला.

याबाबत एका युवकाने पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण सह शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी याबाबत चौकशी करत काही पुरावे गोळा करुन युवतीच्या वयाचा पुरावा देखील सदर विद्यालयातून मिळविला. दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी सर्व माहिती सनसवाडी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे यांना दिली. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी यांनी सर्व प्रकारची चौकशी करत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बालविवाहाची फिर्याद दिली.

याबाबत सणसवाडी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी पाळणात हरिश्चंद्र पवणे (वय ५५) रा. रामलिंग रोड शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे मुळ रा. टाकळी खंडेश्वरी ता. कर्जत जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सणसवाडीच्या माजी सरपंच असलेल्या नवरदेव मुलाची आई रोहिणी रवींद्र भुजबळ, नवरदेवाचे वडील रवींद्र बापू भुजबळ, युवतीचे वडील रमेश उर्फ रामदास दिलीप ताम्हाणे, युवतीची आई रेश्मा रमेश ताम्हणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

23 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

23 तास ago