क्राईम

शिरुर तालुक्यात जमिनीच्या वादातून भावाकडून चुलत बहिणीचा खून

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यामध्ये जमिनीच्या वादातून अनेक लहान मोठ्या घटना घडत असताना केंदूर येथील महादेव वाडी मध्ये चुलत भावाने जमिनीच्या वादातून आपल्या सख्ख्या चुलत बहिणीचा कोयत्याने वार करत खून केल्याची घटना घडली असून आशा भागोजी साकोरे असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव तर विलास यशवंत साकोरे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथील महादेववाडी मधील विलास साकोरे व त्याची चुलत बहीण आशा साकोरे यांच्यात जमिनीच्या वाटपातून वाद सुरू होते. अनेक दिवस वाद सुरु असल्याने सायंकाळच्या सुमारास आशा ही महिला घरासमोरील रस्त्याने जात असताना विलास साकोरे हा सदर ठिकाणी कोयता घेऊन आला आणि आशाच्या डोक्यात व अंगावर वार केले. यावेळी आशा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मयत झाली.

सदर घटनेत आशा भागोजी साकोरे रा. महादेव वाडी केंदूर (ता. शिरुर) जि. पुणे या महिलेचा मृत्यू झाला असून घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, वैभव स्वामी, नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे, पोलीस हवलदार शिवाजी चितारे, पोलीस नाईक विशाल देशमुख, आत्माराम तळोले, राहुल वाघमोडे, अमोल दांडगे, किशोर शिवणकर, प्रताप कांबळे यांसह आदींनी सदर ठिकाणी धाव घेत काही नागरिकांच्या मदतीने खून करणाऱ्या विलास यशवंत साकोरे रा. महादेव वाडी केंदूर (ता. शिरुर) जि. पुणे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता जमिनीच्या वादातून सदर खून केल्याची कबुली त्यांनी दिली तर रात्री उशिरा पर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

16 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

16 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

16 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

16 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

16 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

16 तास ago