शिरूर तालुका

कासारीच्या उपसरपंचपदी रोहिणी रासकर बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत उपसरपंचपदी रोहिणी दत्तात्रय रासकर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वसंत पवार यांनी दिली आहे.

कासारी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचातचे उपसरपंच गोपाळ भुजबळ यांनी त्यांच्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने नुकतीच लोकनियुक्त सरपंच सुनिता भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी वसंत पवार यांच्या देखरेखीखाली उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली यावेळी सरपंच सुनिता भुजबळ, मावळते उपसरपंच गोपाळ भुजबळ, किरण रासकर, गणपत काळकुटे, स्वाती नवले, रोहिणी रासकर, स्नेहल भुजबळ हे उपस्थित होते.

दरम्यान उपसरपंच पदासाठी रोहिणी रासकर यांनी अर्ज दाखल केला तर त्यांच्या विरोधात अन्य कोणाचाही अर्ज न आल्याने रोहिणी रासकर यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वसंत पवार यांनी जाहीर केले, तर निवडीनंतर माजी पंचायत समिती सदस्य राजाभाऊ भुजबळ, लोकनियुक्त सरपंच सुनीता भुजबळ, मावळते उपसरपंच गोपाळ भुजबळ, माजी सरपंच गुलाब सातपुते, सुखदेव भुजबळ, विष्णुपंत नरके, अशोक फुलावरे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय रासकर, सोसायटीचे संचालक विजय सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष तबन भुजबळ यांसह आदींच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच रोहिणी रासकर यांचा सन्मान करण्यात आला, तर निवडी नंतर बोलताना गावातील सर्व ज्येष्ठांना बरोबर घेऊन गावचा विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच रोहिणी रासकर यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

11 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

11 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

15 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

15 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

16 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

16 तास ago