RANJANGAON
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शेतकऱ्यांची बुरुंजवाडी येथे शेतात पाणी देण्याच्या वादातून भांडणे होत दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे रावसाहेब बबन दिघे, शिवम रावसाहेब दिघे, मल्हारी बबन दिघे, सत्यम मल्हारी दिघे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील रावसाहेब दोघे व मल्हारी दोघे या सख्या भावांची बुरुंजवाडी गावच्या हद्दीत शेती असून त्यांच्या शेतातील सामाईक विहिरीतून दोघे पिकांना आळीपाळीने पाणी देत असतात, त्यांच्यात पिकांना पाणी देण्यावरुन वाद झाला, तर वादाचे रुपांतर हाणामारीत होत दोघांमध्ये जबर हाणामारी होत दोघांसह त्यांची मुले देखील जखमी झाले.
याबाबत रावसाहेब बबन दिघे व मल्हारी बबन दिघे रा. दिघेवस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असल्याने पोलिसांनी रावसाहेब बबन दिघे, शिवम रावसाहेब दिघे, मल्हारी बबन दिघे, सत्यम मल्हारी दिघे यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तेजस रासकर व संदीप जगदाळे हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…