शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सालकरमळा परिसरात शेतीच्या नांगरणीवरून दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. स्वाती राजेंद्र दळवी (वय ३८, रा. चांडोह, सालकरमळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेआठच्या सुमारास सालकरमळा येथील शेतजमिनीत हा प्रकार घडला.
फिर्यादी स्वाती दळवी व त्यांची जाऊ प्रियांका दत्तात्रय दळवी या शेताजवळ उभ्या असताना आरोपी विश्वास चंद्रकांत सालकर हा ट्रॅक्टरने संबंधित जमिनीत नांगरणी करत होता. यावेळी त्याला समजावण्याचा प्रयत्न करताच वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींसह इतरांनी घटनास्थळी येत दमदाटी केली.
दरम्यान, आवाज ऐकून फिर्यादींच्या कुटुंबातील सदस्य घटनास्थळी आले असता आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.या गोंधळात फिर्यादींची सासू सुमन दादाभाऊ दळवी व जाऊ प्रियांका दत्तात्रय दळवी यांच्या गळ्यातील प्रत्येकी अर्धा तोळ्याचे मनीमंगळसूत्र तुटून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी विश्वास चंद्रकांत सालकर, जयहिंद चंद्रकांत सालकर, स्वप्नील सूर्यभान सालकर, संजय बाळू सालकर, राजेंद्र बाळू सालकर, मंदाबाई चंद्रकांत सालकर, प्रिती जयहिंद सालकर, चंद्रकांत सखाराम सालकर व अविनाश सूर्यभान सालकर (सर्व रा. चांडोह, सालकरमळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वाद नेमका कशामुळे चिघळला याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…
शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…
पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…