१५ जण जखमी, ४ वाहतूक पोलीसही बाधित
सांगली: कुणी कामावरून घरी परतत होतं, कुणी बाजारातून भाजी घेऊन निघालं होतं, तर कुणी कर्तव्यावर तैनात राहून रस्ता सुरक्षित करत होतं. मात्र पुढच्याच क्षणी मृत्यू समोर येईल, याची कल्पनाही कुणाला नव्हती. सांगली शहरात सोमवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं.
सांगली शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गणपती मंदिर ते टिळक चौक परिसरात एका मद्यधुंद इनोव्हा कार चालकाने रस्त्यावर थरार माजवला. या चालकाने गाडीवरील ताबा गमावत रस्त्याने जाणाऱ्या १४ ते १५ नागरिकांना जोरदार चिरडले. या अपघातात ४ वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित इनोव्हा चालक प्रचंड मद्यधुंद अवस्थेत होता. गणपती पेठेतून टिळक चौकाकडे भरधाव वेगात जात असताना त्याने दुचाकीस्वार, पादचारी तसेच बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांना एकामागून एक धडक दिली. चालकाची गाडी वेडीवाकडी धावत असल्याचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ देखील समोर आला असून, सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नागरिकांचा संताप अनावर
हा थरार डोळ्यादेखत पाहिल्यानंतर परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले जखमी पाहून संतप्त जमावाने इनोव्हा कार अडवली. जमावाने कारची जोरदार तोडफोड केली, तसेच मद्यधुंद चालकाला गाडीबाहेर काढून बेडम चोप दिला. जमावाच्या मारहाणीत चालकही गंभीर जखमी झाला असून, त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाची धावपळ
घटनेची माहिती मिळताच सांगली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींमध्ये ४ वाहतूक पोलिसांचा समावेश असल्याने पोलीस दलातही मोठी खळबळ उडाली आहे. सध्या संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आरोपी चालकावर कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मद्यधुंद वाहनचालकांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…