क्राईम

शिक्रापुरात कार मालकाने दिले बनावट इन्सुरन्स कागदपत्र

द न्यू इंडिया इन्सुरन्स कंपनीकडून कार मालकावर गुन्हा दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे दोन वर्षापूर्वी झालेल्या अपघाता दरम्यान एका कार मालकाने पोलिसांच्या तपासामध्ये चक्क बनावट इन्सुरन्सव कागदपत्रे जोडल्याचा प्रकार समोर आलेला असल्याने इन्सुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी साहेबराव दशरथ पाचुंदकर या कार मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन वर्षांपूर्वी एम एच १२ डी जि ०२६३ व एम एच १२ एल आर ५७२७ या दोन वाहनांचा अपघात झालेला होता, यावेळी एम एच १२ डी जि ०२६३ या कारचे मालक असलेले साहेबराव पाचुंदकर यांनी त्यांच्या वाहनाचे द न्यू इंडिया इन्सुरन्स कंपनीचे इन्सुरन्स कागदपत्र पोलीस तपासात नुकसान भरपाई मिळण्यासाठी जमा केलेले असताना पोलिसांनी त्याबाबतची कार्यवाही करत न्यायालयात कागदपत्रे सादर केली त्यांनतर न्यायालयाने नुकसान भरपाईसाठी द न्यू इंडिया इन्सुरन्स कंपनीकडे कागदपत्रे सादर केली असता इन्सुरन्स कंपनीच्या पडताळणी मध्ये साहेबराव पाचुंदकर यांनी पोलिसांकडे सादर केलेली इन्सुरन्स कागदपत्र बनावट असल्याचे समोर आले.

त्यामुळे पाचुंदकर यांनी इन्सुरन्स कंपनीची बनावट कागदपत्र सादर करुन कंपनीची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने द न्यू इंडिया इन्सुरन्स कंपनीच्या वतीने राहुल मधुकर देवपूरकर (वय ४६)  रा. नवी पेठ पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी साहेबराव दशरथ पाचुंदकर रा. रांजणगाव गणपती (ता. शिरुर) जि. पुणे या इसमावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

5 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

5 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

5 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

5 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

6 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

6 तास ago