क्राईम

खंडणी मागणारे पाच पोलिस कर्मचारी निलंबित

बुलढाणा: चित्रपट व्यवसायाशी संबंधित कर्नाटक राज्यातील चार जण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लोकेशन बघण्यासाठी मलकापूरकडे आपल्या वाहनाने निघाले होते. दरम्यान चिखली बुलडाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी तर, पुढे आणखी तीन पोलिसांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना खंडणी मागितली.

पाचही खंडणीखोर पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणात पाचही आरोपी पोलिसांविरुद्ध चिखली पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

सविस्तर असे की, कर्नाटकातील चलकेरे येथील ताज अ. रहमान (वय २३) हे अकिब अरमान रहेमतुल्ला, शेख इब्राहिम अब्दुल कादीर आणि जुबेर अहमद जाफर या सहकाऱ्यांसह के.ए. ११ ए २८६२ क्रमांकाच्या कारने ६ ऑगस्ट रोजी मलकापूरकडे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकेशन पाहण्यासाठी येत होते.

दरम्यान, चिखली-बुलडाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले. वाहनाची कागदपत्रे मागवून कारवाई टाळण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी केली. यानुसार पेटीएमद्वारे चहावाल्याकडे १५०० रुपये दिल्यानंतर त्यांना पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली. यानंतर काही अंतरावर आणखी तीन पोलिसांनी पाठलाग करत पुन्हा त्यांचे वाहन अडवले.

वाहनात ठेवलेल्या एअर रायफलच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले. ते क्युआर कोडद्वारे भरण्याचे सांगण्यात आले. ताज रहमान यांना संशय आल्यामुळे त्यांनी वाहनासह निघून जाण्याचा प्रयत्न केला. ताज यांनी वाहन थांबवून त्यांना खाली उतरवले, मात्र लगेच वाहनाचे नियंत्रण सुटून अपघात झाला, दिलेल्या तक्रारीनुसार, चिखली पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल टेकाळे आणि जिल्हा वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल भंडारी यांनी १५०० रुपये ऑनलाइन पद्धतीने चहा विक्रेत्याच्या खात्यावर जमा करून घेतले. त्यानंतर महामार्ग पोलिस मदत केंद्रातील काळूसे, आंधळे आणि किरके यांनी दोन लाखांची खंडणी मागितली व नंतर ती रक्कम ५० हजार रुपयांवर तडजोड केल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे.

हे आहे आरोपी कर्मचारी

पोलिस हवालदार गजानन भंडारी (जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा बुलडाणा), पोलिस शिपाई अभय टेकाळे (चिखली पोलिस स्टेशन), या दोघांसह महामार्ग पोलिस मदत केंद्र मलकापूर येथील पोलिस हवालदार विठ्ठल काळुसे, शिपाई संदीप किरके व शिपाई विजय आंधळे या खंडणीखोर पोलिसांना पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

6 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

14 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago