शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील स्वप्ननगरी हौसिंग सोसायटी मध्ये राहणाऱ्या चंद्रकांत गुलाबराव गुलाखे या व्यक्तीला रात्रीच्या वेळी फिट येऊन त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील स्वप्ननगरी हौसिंग सोसायटी मध्ये राहणारे चंद्रकांत गुलाखे यांना २९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास फिट आल्याने शेजारील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र उपचार सुरु असताना चंद्रकांत गुलाबराव गुलाखे (वय ४२) रा. स्वप्ननगरी हौसिंग सोसायटी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांचा मृत्यू झाला.
याबाबत शरद नारायण झांबरे (वय ४१) रा. स्वप्ननगरी हौसिंग सोसायटी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बापू हडागळे हे करत आहे.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची…
११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…