क्राईम

जांबुतमध्ये फोडले कपडयाचे दुकान अन…

बेट भागात चोऱ्यांचे सत्र सुरुच

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील गावठाणातील महेंद्र जाधव यांचे रामकृष्ण हरी वस्त्र भांडार अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पाठीमागच्या बाजूने पत्रा व प्लायवूड तोडून फोडले आहे.

दुकानात प्रवेश न करता बाहेरुनच किरकोळ कपडे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. रात्रगस्त सुरु असतानाही चोरटे घाबरत नसल्याचे चित्र समोर येत आहे. काही दिवसांपुर्वी पिंपरखेड येथे जबरी चोरी झाली असताना पुन्हा दुसऱ्या दिवशी चोरीच्या उद्देशाने आलेले चोरटे पोलिसांच्या सतर्कतेमुळे गाडी सोडून पळून गेले होते.

बेट भागात पक्के बांधकाम न करता चहूबाजूने पत्र्याची मांडणी करुन अनेक प्रकारची मोठी दुकाने थाटली आहे. त्यात लाखो रुपयांचा माल ते ठेवत आहे. बाजूचा पत्रा उचकटून अनेक चोरीच्या घटना घडत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातूनही ही अतिशय चुकीची बाब आहे. नुसते पोलिसांवर अवलंबुन न राहता आपली दुकाने सीसीटीव्ही कॅमेरे व पक्क बांधकाम असणाऱ्या ठिकाणी सुरु करणे गरजेचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

6 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

14 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago