शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील एक महिला बँकेत गेलेली असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करुन घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम अशा तब्बल 1 लाख 63 हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे.
पाबळ (ता. शिरुर) येथील कविता जाधव हि महिला दुपारच्या सुमारास बँकेत गेलेली होती काही वेळाने घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा आणि घरातील कपाट उघडलेले आणि त्यातील साहित्य अस्थाव्यस्थ पडल्याचे जाधव यांना दिसले. त्यामुळे त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख 15 हजार रुपये असा तब्बल 1 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले.
याबाबत कविता सोमनाथ जाधव (वय ४२) रा. पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश सुतार हे करत आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…