शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जकाते वस्ती येथून सकाळच्या सुमारास मुलाला शाळेत सोडून पुन्हा घरी जाणाऱ्या महिलेचे दागिने दोन अज्ञात युवकांनी लांबविल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल आकरण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जकाते वस्ती येथील अंजिता पांडे महिला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. मुलाला शाळेत सोडून पुन्हा घरी जात असताना रस्त्यात दुचाकीहून दोन युवक आले त्यातील एका मुलाने पांडे त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. यावेळी महिलेने पत्ता माहित नाही असे म्हटले असता त्यातील एका मुलाने पांडे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले त्यावेळी पांडे यांनी सदर युवकाची कॉलर पकडत प्रतिकार केला. मात्र युवक पळून जाण्यात यशस्वी झाला.
याबाबत अंजिता संतोष पांडे (वय ३८) रा जकाते वस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात दोन युवकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…