क्राईम

शिरुर तालुक्यात टोळक्याकडून दोन ठिकाणी युवकांना हाणामारी

युवकांकडून दुचाकीवर फिरत कोयत्याने मारहाण करत दहशतीचा प्रयत्न

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील काही युवकांकडून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच गावामध्ये दुचाकीहून फिरत दहशत निर्माण करुन दोन वेगवेगळ्या ठिकाणी युवकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ओमकार शेवकर, अदनान शेख, किरण जाधव, श्रीनात सोनटक्के यांसह पाच ते सहा अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाजार मैदानाजवळून यश घुमे त्याच्या चुलत भावासह जात असताना ओमकार शेवकर, अदनान शेख सह काही युवक दुचाकीहून आले. त्यांनी काहीही कारण नसताना दहशत निर्माण करत यश सह त्याच्या चुलत भावाला शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण करत अदनान शेख याने त्याच्या हातातील कोयत्याने यशला मारहाण करत सर्व युवक निघून गेले.

काही वेळातच सर्व युवकांनी त्यांच्या मोर्चा गुजर प्रशालेकडे वळविला तेथे जात ओमकार शेवकर याने सारंग आल्हाट या युवकाला धक्का देऊन वाद घालत मी काय आहे तुला सांगतो, तू माझ्या ग्रुपचे नाव सोशल मिडीयावर का टाकत नाही, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत आलेल्या युवकांनी सारंग सह त्याच्या मित्राला मारहाण केली. यावेळी सारंग पळून त्याच्या चुलत्यांच्या घरी गेला असता मारहाण करणाऱ्या युवकांनी तेथे गर्दी करत सारंग आल्हाट सह त्याच्या मित्राला जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत यश संतोष घुमे वय १९ वर्षे व सारंग महेंद्र आल्हाट वय १९ वर्षे दोघे रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ओमकार शेवकर, अदनान शेख, किरण जाधव, श्रीनात सोनटक्के यांसह ५ ते ६ अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग व अमोल चव्हाण हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

3 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

3 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

21 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago