Skip to content
रविवार, एप्रिल 26, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

शिरुर तालुक्यात इंस्टाग्राम अकाउंटला तलवारीचा फोटो ठेवल्याने युवकावर गुन्हा दाखल 

क्राईम मुख्य बातम्या
जुलै 25, 2023जुलै 25, 2023शिरूर तालुका टीम

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी चार्ज घेताच शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला असल्याने त्यामुळे सर्वसामान्य नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. दोन दिवसांपुर्वीच इंस्टाग्रामवर कोयत्याचे स्टेटस ठेवणाऱ्या दोन युवकांवर कारवाई केल्याची घटना ताजी असताना आता गुनाट (ता. शिरुर) येथील वैभव उर्फ दत्तात्रय भाऊसाहेब झिटे या युवकावर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुनाट येथील वैभव झिटे याचे त्याच्या Vaibhav_zite.84 या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टेटसला दहशत पसरवण्याच्या दृष्टीने तलवार असलेला फोटो ठेवला आहे अशी गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांना समजली. पाटील यांनी याबाबत पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सांगितल्याने त्यांनी लगेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक करुन तलवार जप्त केली. याबाबत शिरुर पोलिस स्टेशनचे गोपनीय पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस नाईक नाथा जगताप, पोलिस नाईक विनोद मोरे, विशाल कोथळकर, पोलिस हवालदार परशुराम सांगळे, पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, रघुनाथ हाळनोर, विनोद काळे, नितेश थोरात, बाळा भवर, सचिन भोई यांनी केली आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक नाथा जगताप हे करत आहेत.

तसेच यापुढेही कोणी सोशल मिडियाद्वारे दहशत माजविण्याचा प्रकार केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिला आहे.

Tagged accountCrimeInstagramNewspicturepostingregisteredshirurtalukaswordYouth

पोस्टचे नॅव्हिगेशन

सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्या या राजकिय हेतूने प्रेरित; अंबादास दानवे
राज्यातील विश्रामगृहे सुस्थितीत असावीत; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे 

संबंधित पोस्ट

कोरेगाव भिमातील कंपनीची अठरा टक्क्यांची सावकारी

मार्च 1, 2023मार्च 1, 2023शिरूर तालुका टीम
mother love child

प्रिय अंजनी आई…तुझ्याशिवाय जगणं पोरक झालंय ग आई… या लेकराची साद ऐकून धावत….ये ग आई

जून 18, 2023जून 18, 2023शिरूर तालुका टीम

अष्टविनायक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत मोटरसायकल स्वाराचा मृत्यू…

जून 20, 2024शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…
  • शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…
  • विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी
  • ‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार
  • पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

Popular Categories

  • आरोग्य (2,217)
  • इतर (152)
  • क्राईम (1,596)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (365)
  • मनोरंजन (166)
  • महाराष्ट्र (4,659)
  • मुख्य बातम्या (2,043)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (950)
  • शिरूर तालुका (2,706)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ... Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…
  • शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…
  • विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी
  • ‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार
  • पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!