क्राईम

कान्हूर मेसाईत मैत्रिणीनेच मारला सात लाखांच्या दागिन्यावर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे घरी आलेल्या मैत्रिणीने घरातील 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 7 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रतीक्षा अविनाश चौरे या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील प्रीती तळोले या महिलेचे सहा महिन्यापूर्वी लग्न झालेले असून प्रीती यांची बाल मैत्रीण प्रतीक्षा ही यापूर्वी देखील तळोले यांच्या घरी आलेली होती, तर नुकतेच प्रतीक्षा ही तळोले यांच्या घरी दोन दिवस मुक्कामासाठी आलेली होती.

तळोले यांचे घरातील सर्वजण शेतात कामाला गेलेले असताना प्रतीक्षा ही घरीच होती दुपारनंतर प्रतीक्षा ही तिच्या घरी जाते म्हणून गेली त्यानंतर तळोले त्यांनी कपाट उघडले असता कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त झाल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे कपाटातील पाहणी केली असता कपाटातील 15 तोळे सोन्याचे दागिने व 25 हजार रुपये रोख रक्कम असा 7 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज नसल्याचे दिसून आले.त्यामुळे प्रतीक्षा चौरे हिने घरात चोरी केली असल्याचे निदर्शनास आले.

याबाबत प्रीती अनिकेत तळोले (वय २4) रा. फलके वाडी रोड कान्हूर मेसाई (ता. शिरुर) जि. पूणे या महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी प्रतीक्षा अविनाश चौरे रा. चासकमान ता. खेड जि. पूणे या महिलेवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर हे करत आहे.

प्रतीक्षा चौरे कडून यापूर्वी आईच्याच दागिन्यांची चोरी…

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चोरीचे गुन्हे दाखल झालेली महिला प्रतीक्षा चौरे या महिलेने यापूर्वी स्वतःच्याच आईचे दागिने चोरल्याची घटना घडलेली असून सदर गुन्ह्यांमध्ये कालच खेड पोलिसांनी प्रतीक्षा हिला अटक केली आहे, तर खेड पोलिसांच्या तपासानंतर प्रतीक्षा चौरे हिला शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

15 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago