surekha-patil-kolhapur
कोल्हापूर: आकुर्डे (ता. पन्हाळा) येथील उपसरपंच अनिल पाटील यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुरेखा ऊर्फ स्वाती अनिल पाटील (वय 40) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सुरेखा यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
आत्महत्या केलेल्या सुरेखा पाटील यांचे पती अनिल पाटील गावचे उपसरपंच आहेत. तसेच पन्हाळा तालुक्यातील काटेभोगावमध्ये हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक आहेत. पती अनिल हॉलमध्ये तर पत्नी सुरेखा या बेडरुममध्ये शनिवारी (ता.12) विश्रांती घेत होत्या. दुपारी एकच्या सुमारास अनिल पाटील यांनी पत्नी सुरेखा यांना हाक मारली पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बराच वेळ झाल्यानंतर शेजारच्या लोकांना बोलावून दरवाजा तोडला. त्यावेळी सुरेखा यांनी छताच्या हुकाला साडीने गळफास घेतला होता. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील तरुणाने राहत्या घरी सुती कापडाच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ओम पंढरीनाथ महाजन (वय 18) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी हुपरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. ओम हा बारावी उत्तीर्ण होता. त्याच्या मागे आई, वडिल असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
दुसऱ्या एका घटनेत दोन लहान मुलांच्या भांडणात पालक भिडल्याने एका पालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये घडली. सद्दाम सत्तार शेख (वय 27 , रा. स्वामी मळा, इचलकरंजी) असे त्यांचे नाव आहे. हा भयानक प्रकार कोले मळा येथील एका शाळेत घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सद्दामच्या मृत्यू प्रकरणी शब्बीर अब्दुल गवंडी (रा. हनुमाननगर) याच्यासह दोन महिलांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू…
शिरूर तालुक्यात उपसरपंचाने केली व्यावसायिकास मारहाण…
पाकिटमारी करणाऱ्या सरपंचाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
शिरुर तालुक्यातील उपसरपंचाने भष्ट्राचाराबाबत तक्रारी केल्याने महीला सरपंचांकडून मारहाण
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…