Beaten

शिरूर तालुक्यात उपसरपंचाने केली व्यावसायिकास मारहाण…

क्राईम

सविंदणे (अरुणकुमार मोटे): वडनेर खु. (ता. शिरूर) येथील मोटार वायडिंग व्यावसायिकास उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने विद्यमान उपसरपंचाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. उपसरपंचाविरुद्ध शिरूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने वडनेर चे उपसरपंच विक्रम बाळू निचीत आणि त्यांच्या आईने मारहाण केल्याची तक्रार ज्ञानदेव रामभाऊ निचीत यांनी शिरूर पोलिसांत दाखल केली आहे. इलेक्ट्रीक मोटारीची वायडींग केलेल्या कामाचे राहीलेले पैसे मागण्यासाठी गेलो व माझा नंबर ब्लॉक लिस्टला टाकला आहे, कामाचे पैसे देवून टाक, पैसे घेतल्याशिवाय मी जाणार नाही आणि नंतर मी तुझे घराकडे परत येणार नाही, असे बोललो असता आईने कॉलर पकडून शिवीगाळ व दमदाटी केली.

विक्रम याने शिवीगाळ, दमदाटी करून लोखंडी रॉडने पायाचे अंगठ्याजवळ, डावे हाताचे कोपराजवळ, तळहाताला मारून फॅक्चर करून गंभीर दुखापत केली आहे, असे ज्ञानदेव निचित यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. सपोनि अमोल पन्हाळकर पुढील तपास करत आहेत.

शिरुर तालुक्यात पहील्या गुन्ह्यात ताप्तुरत्या स्वरुपाचा जामिन असतानाही त्या माजी उपसरपंचाचा प्रताप

अपमानित करणारी पोस्ट टाकल्याच जाब विचारल्याने सरपंच महिलेसह नातेवाईकांना मारहाण

शिरुर तालुक्यातील उपसरपंचाने भष्ट्राचाराबाबत तक्रारी केल्याने महीला सरपंचांकडून मारहाण

जातीवाचक शिविगाळ व सरकारी कामात अडथळा आणणारा माजी उपसरपंच आरोपी अद्याप मोकाट…

शिरुर तालुक्यात माजी उपसरपंचाला ऐन यात्रेवेळी पोलिसांकडून अटक