महाराष्ट्र

डी.एड कॉलेजच्या माजी अध्यापक-अध्यापिकांचा स्नेहमेळावा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कांताबाई पानसरे डी.एड कॉलेज (इंग्लिश माध्यम) पुणे (बॅच सन 2010-12) येथील माजी अध्यापक व अध्यापिका यांचा स्नेहमेळावा तब्बल 11 वर्षांनी विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथील डेक्कन जिमखाना येथील नामांकित हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आला होता.

बालपण देगा देवा असे आपण म्हणतो, पण गेलेला दिवस पुन्हा येत नाही, पण त्या आठवणींना आपण पुन्हा उजाळा देऊन ते क्षण पुन्हा प्रत्ययात आणण्याचा संयोजकांचा प्रयत्न होता. आत्तापर्यंतच्या जीवनातील प्रवासाची सर्वांनी आपुलकीने विचारपूस केली. कॉलेज जीवनातील मर्मबंधातील आठवणींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन करून झाली. सर्वांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी मुंबई, सोलापूर, अहमदनगर, जालना, पुणे, सातारा आदी जिल्ह्यांतून आले होते.

यातील बहुतांशी पुणे व मुंबई महानगर पालिकेत शिक्षक, खाजगी शाळेत शिक्षक, मंत्रालयात अधिकारी, पोलीस, सैन्यदल, राज्य परिवहन महामंडळ, बँक, पत्रकार, व्यवसाय तर काहीजण उत्कृष्ठ पद्धतीने शेती करत आहेत.

अनिता कुंभार, दादासाहेब गुंड, स्नेहा गाढवे, अभिजित धामणे, सारिका भोये, किरण नरळे यांनी कॉलेज आठवणींना उजाळा दिला. स्नेह मेळाव्यासाठी पार्वती भानवसे, प्रियंका कांबळे, माधुरी बदर, नूतन माने, वंदना पडवी, निकिता जाधव, अमोल लोहार, स्वप्निल गावडे यांनी पुन्हा भेटण्याचा संकल्प करून, एक उत्तम निधी उभारून गरिबांना मदत करण्याचे ठरविले. प्रास्ताविक स्वप्ना व्होरकाटे यांनी तर सूत्रसंचालन विजय थोरात तर आभार तेजस ब्राम्हणे यांनी मानले.

11 वर्षांनंतर आम्ही सर्वजण भेटल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असला तरी पुन्हा एकदा सर्वजण एकत्रित येऊन आनंदित झाले. पुढील भविष्यकाळात सन (2010-12) बॅचचा मोठा स्नेहमेळावा आयोजित करण्याचे सर्वांनी ठरविले.
– विजय थोरात

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

6 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

1 आठवडा ago