parbhani crime

राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू…

महाराष्ट्र

परभणी: महिलेला उपसरपंच पदाचा राजीनामा दे म्हणत सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांकडून झालेल्या मारहाणीत उपसरपंच महिलेच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ब्राह्मणगाव (ता. सेलू) येथे घडली आहे. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी सरपंचांसह इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

ब्राह्मणगाव येथील उपसरपंच शशिकला कांबळे यांच्या घरी 5 ऑगस्ट रोजी गावच्या सरपंच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे हे सर्व जण आले आणि तुम्ही उपसरपंच पदाचा राजीनामा द्या, असे म्हणत वाद घातला. याच वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले आणि सरपंच साधना डोईफोडे यांच्या गटाकडून कांबळे यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत उपसरपंच शशिकला कांबळे यांचा मुलगा निखिल कांबळे याला रॉडने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. रविवारी (ता. 6) रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या निखिल यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

शशिकला कांबळे यांनी सेलू पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरुन सरपंच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे यांच्यावर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केला असून, या सर्वांना अटक करण्यात आली आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यात उपसरपंचाने केली व्यावसायिकास मारहाण…

पाकिटमारी करणाऱ्या सरपंचाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

शिरुर तालुक्यात पहील्या गुन्ह्यात ताप्तुरत्या स्वरुपाचा जामिन असतानाही त्या माजी उपसरपंचाचा प्रताप

शिरुर तालुक्यातील उपसरपंचाने भष्ट्राचाराबाबत तक्रारी केल्याने महीला सरपंचांकडून मारहाण

शिरुर तालुक्यात सरकारी कामात अडथळा करणाऱ्या माजी उपसरपंचाचा जामिन फेटाळला