शिरुर तालुक्यातील उपसरपंचाने भष्ट्राचाराबाबत तक्रारी केल्याने महीला सरपंचांकडून मारहाण

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): इनामगाव (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीमधील भ्रष्ट्राचाराबाबत उपसरपंच सिद्धेश्वर शिवाजी नांद्रे रा. इनामगाव यांनी तक्रार केल्याने चिडून जाऊन सरपंच पल्लवी संजय घाडगे व तिचे पती संजय रमेश घाडगे, नातेवाईक बाळासो रमेश घाडगे, प्रविण विलास घाडगे, सुरेश मचाले, प्रज्वल मचाले, राजेंद्र लालसो घाडगे सर्व रा. ईनामगाव यांनी अनकुचीदार दगडाने व लाथाबुक्याने मारहाण केली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी, की. (दि ५) मे रोजी सकाळी ११ :३० वा. चे. सुमारास ग्रामपंचायत ईनामगाव येथे मासिक मिटीग असताना सरपंच राजिनाम्याबाबत शहानीशा झाल्यानंतर सिद्धेश्वर नांद्रे यांनी सरपंचाविरोधात विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रारी वरून चिडुन जावून सरपंच पल्लवी घाडगे यांनी तिचे पती संजय रमेश घाडगे, त्याचा दिर बाळासो रमेश घाडगे, चुलत दिर प्रविण विलास घाडगे, त्यांचे वडील सुरेश मचाले, चुलत भाऊ प्रज्वल नचाले यांना ग्रामपंचायत कार्यालय येथे बोलावून वरिल सर्वानी उपसरपंच सिद्धेश्वर शिवाजी नांद्रे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली व सरपंच पल्लवी घाडगे यांनी अनकुचीदार दगडाने पाठीमागुन येवून नांद्रे यांच्या डोक्यात पाठीमागच्या बाजुला दगडाने मारून जखमी केले आहे. व संजय घाडगे यांनी काठीने मारहाण केली.

त्यानंतर राजेंद्र लालसो घाडगे हा शिवीगाळ करत आला त्यानेही हाताने लाथाबुक्क्यानी मारहाण केली. सरपंच महीला व तिचे पती, दिर, चुलत दिर, वडील भाऊ यांच्याविरुध्द शिरूर पोलिस स्टेशन येथे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव हे करत आहे.