दौंड: दौंड शहरात एका अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. खून केल्यानंतर तो स्वतः पोलिस ठाण्याकडे पायी निघाला होता. पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील बाजार तळाजवळील इंदिरानगर येथे हा खून करण्यात आला. प्रविण दत्तात्रेय पवार (वय ३५) , रा. इंदिरानगर, बाजारतळाजवळ, दौंड असे मृताचे नाव आहे. १४ ऑगस्ट रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास हा खून झाला.
प्रविण दत्तात्रेय पवार याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यावरून अल्पवयीन मुलाचे प्रविण याच्याबरोबर यापूर्वी देखील वाद झाले होते. त्याबाबत सातत्याने सांगूनही प्रविण पवार ऐकत नसल्याने त्याच्याविषयी महिलेच्या मुलाला प्रचंड राग होता.
दरम्यान मध्यरात्री प्रविण हा इंदिरानगर येथे आल्यानंतर त्याचा महिलेच्या मुलाबरोबर वाद झाला. रागाच्या भरात मुलाने कोयत्याने प्रविण पवार याच्या डोक्यावर, तोंडावर, हातावर व शरीरावर कोयत्याने सपासप वार करीत त्याला जागीच ठार केले. खून केल्यानंतर अल्पवयीन मुलगा स्वतः पायी दौंड पोलिस ठाण्याकडे हजर होण्यासाठी निघाला होता. परंतु पोलिसांना त्याची माहिती मिळताच त्यांनी अर्ध्या रस्त्यात त्याला ताब्यात घेतले. मृत प्रविण पवार हा मटका व चक्री जुगार या अवैध व्यवसायांशी संबंधित होता.
दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी भाजी विक्रेते नितीन अशोक गुप्ते यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार अल्पवयीन मुलाविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम १०३ (खून करणे) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलिस ठाण्याचे उप निरीक्षक रूपेश कदम या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…