क्राईम

‘काय पावती टाकायची ती टाका’ म्हणत पोलिसांना न जुमानता विरुद्ध दिशेने निघाला अन्…

पुणे: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कॉम्बींग ऑपरेशन घेतले होते़ यावेळी सोलापूरकडे जाणाऱ्या रोडवर पहाटे विरुद्ध दिशेने जाणार्‍या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी अशा वाहनांना थांबून परत पाठवले. अशा वेळी एका थार चालकाने पोलिसांना न जुमानता वेगाने विरुद्ध दिशेने गाडी घेऊन गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. करण रामदास महाडिक (वय २५, रा. कुमार मिडोज, मांजरी) असे या थार चालकाचे नाव आहे.

याबाबत अमीत भिमाशंकर साखरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात गुरुवारी रात्री दहा ते शुक्रवारी पहाटे २ वाजेपर्यंत कॉम्बींग ऑपरेशन घेण्यात येत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार राऊत, चव्हाण, केसकर, हिरवे, चोरमले हे कॉम्बींग ऑपरेश करीत रवी दर्शन चौकात आले. त्यावेळी पुण्याहून सोलापूरकडे मोठ्या प्रमाणावर विरुद्ध दिशेने वाहने जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे विरुद्ध दिशेने येणार्‍या वाहनांस पुन्हा माघारी पाठवून वाहतूक सुरळीत करीत ते सिद्धेश्वर पेट्रोल पंपाजवळ आले.

त्यावेळी एक थार गाडी भरधाव वेगाने वाहतुकीस अडथळा करीत व धोकादायक स्थितीने गाडी चालवत त्यांच्या दिशेने आली. गाडीचालक व त्याचे २ साथीदार गाडीत होते. त्यांना थांबवून विरुद्ध दिशेने गाडी चालवु नका वाहतूकीला अडथळा होत आहे, असे सांगितले. तरीही चालकाने काही एक न ऐकता गाडी भरधाव चालवत विरुद्ध दिशेने जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन अडविले. त्याला पोलिसांनी विचारणा केली तर त्याने ” तुम्हालाा काय पावती टाकायची आहे ती टाका ” , असे उद्धटपणे उत्तर दिले. त्यानंतर पोलिसांनी त्याला गाडीसह चौकशीसाठी हडपसर पोलीस ठाण्यात आले. करण महाडिक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार कांबळे तपास करीत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई; दोन ठिकाणी छापा टाकत मुद्देमाल जप्त…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन…

3 तास ago

बाभुळसर-करडे अष्टविनायक महामार्गावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…

4 तास ago

शिरुर तालुक्यात विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची…

1 दिवस ago

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

2 दिवस ago